शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Wrong Food Combinations हे पदार्थ सोबत मुळीच खाऊ नये

Wrong Food Combinations आपण जेव्हा दोन खाद्य पदार्थांचे मिसळून खातो किंवा सोबत खातो तेव्हा हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की या पदार्थांमुळे आरोग्याला कुठलंही हा‍नी तर होणार नाही?
 
आयुर्वेदात "अग्नी" हा शब्द अन्नाचे पचन या अर्थाने वापरला जातो. आपल्या शरीराची अग्नी ही संतुलित राहावी, ही काळजी स्वतः घ्यावी. अशात आपली रोगप्रतिकार प्रणाली ही पण फार महत्त्वाची ठरते. असे बरेच पदार्थ असतात जे एकत्र खाणे योग्य नाही आहेत. तर चला जाणून घेऊ या त्यांचाबद्दल:-
 
"विरुद्ध आहार"
* आंबट फळ आणि दूध  
ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन C असतं ते दुधासोबत सेवन करु नये. जेव्हा दूध आणि लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळाचे सेवन केलं जातं तेव्हा दूध गोठण्यास प्रवृत्त होतं त्यामुळे गॅस आणि जळजळ होण्याची भीती असते. यामुळे रक्तसंचय, सर्दी, खोकला, आणि ऍलर्जी देखील होऊ शकते. उदाहरण:- दूध आणि संत्र्याचा रस बरोबर किंवा लगेच घेऊ नये.
 
* चीझयुक्त खाद्यपदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स 
चीझ पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक ही तर जोडीचं आहे. पण हे कॉम्बिनेशन नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. कोल्ड ड्रिंक्समध्ये अधिक प्रमाणात फ्रुक्टोस असतं ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो आणि चीझमध्ये पण खूप फॅट असल्याने हे दोन्ही पदार्थ मिळून व्यक्तीचे शरीरात फॅट्सची वृद्धी करतं आणि पचनसंस्थेला कमकुवत करतं. 
 
* समान प्रमाणात तूप आणि मध 
तूप आणि मध, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले पदार्थ आहेत. दोघांमध्ये इतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात पण तरी ह्यांचे सोबत सेवन करू नये. तूप आणि मध हे समान प्रमाणात मिसळल्याने एका प्रकारचे बॅक्टेरियाची उत्पत्ती होते. हा बॅक्टेरिया शरीरात अशुद्ध आणि विषारी घटक सोडतो ज्याने पोट दुखी, श्वसनविषयक समस्या आणि इतर विषारी समस्या उद्भवू शकतात.
 
* दूध आणि मासे   
आयुर्वेदाप्रमाणे दूध आणि मासे हे कॉम्बिनेशन हानिकारक होऊ शकतं कारण दुधाची तासीर शीतल असते आणि मासे उष्ण. ह्या गरम आणि थंड संयोग असंतुलन पैदा करून शरीरामध्ये रासायनिक बदलावं करू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास हे संयोजन टाळावे. 
 
* कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन
जेव्हा आपण कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च आणि प्रोटीन (जसे की बटाटे किंवा ब्रेडसह मांस) यांचे मिश्रण खाता तेव्हा ते एकमेकांचा प्रतिकार करतात, ज्याने गॅस, गोळा येणे, जळजळ आणि पोटांसंबंधित इतर समस्या होऊ शकते. उदाहरण:- बटाट्यांमध्ये स्टार्च किंवा कार्बोहैड्रेट्स अधिक प्रमाणात असतं आणि मटणात प्रोटीन त्यामुळे ह्यांचे सेवन सोबत करु नये.