दालचिनी पार्किसनचा आजार थांबवू शकते
एका नव्या संशोधनात हे पुढे आलंय की आपल्या जेवणात उपयोगात येणारी दालचिनी पार्किसनचा आजार वाढण्यापासून थांबविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
अमेरिकेतील रश विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हे पुढे आलंय. दालचिनीचा उपयोग या आजारादरम्यान बायोकेमिकल, सेल्युलर आणि स्ट्रक्चरलमध्ये बदल घडवतो.
अभ्यासादरम्यान दालचिनीच्या वापरानं उंदरांच्या मेंदूत अशाचप्रकारचे बदल अनुभवण्यास मिळाले. प्रमुख संशोधक कलिपदा पहन आणि रशमध्ये न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक डेविस म्हणाले, वर्षानुवर्षे दालचिनीचा वापर मोठय़ा प्रमाणात मसाल्याच्या रुपात जगभरात होतोय.
पार्किसननं ग्रस्त असलेले रुग्ण आजार वाढू नये म्हणून प्रमुख उपाय म्हणून याचा वापर करू शकतात आणि ते सुरक्षितही आहे.