सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 10 मे 2021 (18:43 IST)

गिळताना वेदना होत असल्यास हे उपचार अवलंबवा

जेवताना घास गिळताना घसा दुखणे ही काही सामान्य बाब नाही, हे अन्ननलिकेत सूज आल्यामुळे देखील होऊ शकते. या परिस्थितीत घसा खवखवतो, वेदना होते.वैद्यकीय भाषेत याला फॅरेन्जायटीस असे म्हणतात. याचे लक्षण आणि उपाय जाणून घेऊ या .
 
कारण- फॅरेन्जायटीस चे मुख्य कारण व्हायरस आहे. परंतु कधी कधी हे बेक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील होऊ शकते.या व्यतिरिक्त सेकेंड-हॅन्ड-स्मोक आणि सायनसच्या संसर्गामुळे देखील होऊ शकतो.     
 
लक्षणे- घश्यात वेदना होणं,अन्न गिळताना वेदना होणं,सूज येणं आणि घसा खवखवणे हे फॅरेन्जायटीसची मुख्य लक्षणे आहे. 
 
उपचार -
1 पाणी कोमट करून त्यात मीठ घालून गुळणे करा.हे उपचार दिवसातून तीन वेळा केल्याने घश्यातील सूज कमी होईल आणि वेदनेत देखील आराम मिळेल. 
 
2 आलं वापरा- आपली इच्छा असल्यास पाण्यात आलं घालून ते पाणी उकळवून पिऊ शकता. किंवा आल्याचा तुकडा चघळल्याने देखील फायदा होईल. चहामध्ये आलं जरूर वापरावे. 
   
3 कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यावं .हे आराम देत. आपली इच्छा असल्यास या पाण्यात मध घालून देखील पिऊ शकता. 
 
4 ज्येष्ठमध आणि दालचिनी चघळल्याने देखील घशाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. आपण गरम चहा किंवा पाण्यासह हे घेऊ शकता. 
 
5 कोमट पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने देखील आराम मिळतो. या शिवाय लसणाचा वापर केल्याने देखील घशातील सूज आणि वेदना कमी होते.