शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी एरलाईन्स

जर आपण इतर ब्रँड प्रमाणेच पुणेरी कंपनीची विमान सेवा चालू केली आणि त्यांच्या सूचना सर्व काही पुणेरी म्हणजेच रोख-ठोक सिस्टीमने दिल्या तर.....
 
पुणेरी एरलाईन्स (पु. एरलाईन्स) चे एक विमानतळ Welcome to Pune Airlines ✈ लोकं विमानात चढली, अन् अनाउंसमेंट झाली
"सर्वांनी आपापल्या जागेवर पटापट बसून घ्यावे, आपल्या घरातील पॅसेज मध्ये फिरल्या सारखे विमानात इकडून तिकडे फिरत बसू नये"
 
"हवाई सुंदरी आता सेफ्टी डेमो देत आहेत,डेमो एकदाच दाखवला जाईल,, सर्वांनी आमच्या तोंडाकडे न पाहता हाताकडे लक्ष देवून नीट डेमो पहावा, नंतर तक्रार चालणार नाही"
 
"हा सिटबेल्ट असा घट्ट बांधावा, सिटबेल्ट फार ताणू नये, तुटल्यास पैसे भरून द्यावे लागतील" 
 
" पोट फारच सुटले असल्यास, सीटबेल्ट ओढून ताणून बांधण्याचा आग्रह करू नये, तुम्हाला वेगळी सुतळी दिली जाईल" 

"ऑक्सिजन चा दबाव कमी झाल्यास वरून ऑक्सिजन मास्क पडतील, ते पटापट तोंडावर लावावे, याचा मास्क काळा माझा पिवळा का वगैरे वाद घालू नये, सर्वाना सेमच ऑक्सिजन पुरवठा होईल" 
 
" संकटकाळी स्थितीत विमानाचे पुढचे 2 आणि मागचे 2 दरवाजे उघडतील, एकेकानी सय्यम ठेवून उतरावे, फार धक्काबुक्की, गडबड केल्यास दरवाजे आपोआप बंद होतात, अडकून बसावे लागेल"
 
" तुमच्या डोक्यावर एअर होस्टेस ला बोलवायचे पिंक बटन आहे, त्याला अजिबात हात लावू नये "
 
"नाष्टया मध्ये जे असेल तेच मिळेल, आम्हाला वडापाव, भेळ, मिसळच पाहिजे वगैरे हट्ट चालणार नाही, हि सारसबाग नाही"
 
" दुपारी 1 - 4 या वेळेत विमान असेल त्या जागी बंद करण्यात येईल, काळजी नसावी "
 
"विमान तुमच्या डेस्टिनेशन ला पोचल्यावर पटापट उतरावे, निवांत बाहेर पडायला हे चित्रपटगृह नाही"
 
"तुमचा प्रवास सुखकर होवो !"
 
"आता हि पोस्ट कॉपी करून पुण्याच्या जागी दुसऱ्या शहराचे नाव टाकुन तुमच्या पेज वर रिपोस्ट करू नये, काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात"