मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2017 (16:25 IST)

एका विवाहीत मुलीचे आईस पत्र.

आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते......
आता माझी सकाळ 5.30 ला होते आणि
रात्र 12 वाजता.......
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते
आणि स्वतः मात्र शेवटी थंड जेवण जेवते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
जेव्हा सासरी कुणी आजारी पडते..
तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते..
पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा स्वतः ची काळजी स्वतःच घेते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
रात्री सगळे झोपल्यावर त्यांना आठवणीने पांघरूण घालते
पण जेव्हा मला पांघरूण घालायला कुणीही नसते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता
स्वतः लाच विसरते..
पण मन मोकळं करायला जवळ कुणीही नसते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
कदाचीत हीच कहाणी लग्नानंतर प्रत्येक मुलीची होत असेल.....
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगा मुलीला
वचन देतो...
लग्न झाल्यावर सासरी तुला आईची
आठवण येऊ देणार नाही......
पण तरीही का ???.........
 
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येतेय ग...
माहेर म्हणजे काय ???
अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत कळत नाही.