आतुकली-भातुकली
सौ. अर्चना देशपांडे
शाळा संपली, सुटी लागलीमित्र-मैत्रिणी जमू लागलीखेळू आतुकली-भातुकली ।खेळणारी भारीच धीटुकली ।स्वयंपाक बनवला, रुचकर झालाढेकर मात्र मोठा आलाभांडी कुंडी घासलीपितांबरीने चकचकीत झालीदुपारची कामे उरकून घेतली उन्हे गेली तिन्हीसांज झालीपुन्हा स्वयंपाकाची तयारीकंटाळच आला भारीनुसतेच केले भात पिठलेकोणाला नाही आवडले आई-बाबांनी खाल्लेआमचे पोट भरले.... ।