शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

गंमतच गंमत

- सौ. सुषमा दीक्षित

ND
एकदा काय झाले
गंमतच गंमत झाली
उंदिर मामा लागले
म्यॉऊ म्यॉऊ करायला
बोकोबा लागले ची, ची करायला
कुत्रे लागले डकराळी फोडायला
वाघोबा लागले भूंकायला
कावळे दादा लागले
कुहू कुहू करायल
कोकिळा लागली करु काव काव
सारे सारे पाहून
गाढव लागले हसायला
म्हणू लागले जोरात
वन्स मोर ! वन्स मोर!!