शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

वाढदिवस

जयश्री संभाजीराव घुले

ND
आई तू ऐकतेस ना ?
मला, थोडे पैसे देना ।
आज वाढदिवस ना माझा
खायचाय मला पिझ्झा ।।

सगळे मित्र येणार
एकत्र सारे जाणार ।
सगळे पिझ्झा खाणार
मज्जा, मज्जा करणार ।।

नको राजा खाऊ पिझ्झा
उद्या पोट दुखल ना राजा ।
घरीच करू साजरा
बाळा वाढदिवस तुझा ।।

गुलाबजाम, बासुंदी
पुरी भाजी, कांदा भजी ।
खासा बेत जेवणाचा
सुंदर काढू रांगोळ्या ।।

ताई तुला ओवाळेल
औक्षण मी करेन ।
हात जोडून, देवाला
उदंड आयुष्य मागेन ।।