रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (13:20 IST)

अशक्य काहीच नाही...

एकदा राजा अकबर, बिरबल आणि त्याचा दरबारातील काही मंडळी यमुनेच्या काठी फिरत होते. फिरता- फिरता राजाने एक काडी उचलून त्या नदीकाठी असलेल्या वाळूत एक रेष ओढली आणि त्या रेषेला दाखवत आपल्या सह आलेल्या मंडळीं कडे बघून म्हणे 'की मी काढलेल्या या रेषेला स्पर्श ही न करता लहान करून दाखवू शकता का? 
 
सर्व मंडळी म्हणे महाराज हे तर अशक्य आहे. या रेषेला हात न लावता, न पुसता कसं काय लहान करता येईल. अकबर मनातल्या मनात हसत होते त्यांना माहित होते की हे फक्त बिरबलच करू शकतो. तेवढ्यात बिरबल म्हणे महाराज ह्यात अशक्य काहीच नाही.
 
असे म्हणत त्याने काडी हातात घेउन महाराजांनी ओढलेल्या रेषेच्या समांतर एक मोठी रेष ओढली. त्यामुळे महाराजांची रेष लहान झाली. बिरबल महाराजांना म्हणे की बघा महाराज आपल्या अटीप्रमाणे मी हात न लावता आपल्या रेषेला लहान करून दिले. बिरबलच्या युक्ती आणि हुशारीवर अकबर फार खुश झाले.