शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (16:08 IST)

Tenali Raman Story बियाणांचं मडकं

एके काळी भरत आणि कुमार नावाचे दोन मित्र होते. भरताने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. भरताकडे 5000 सोन्याची नाणी होती. त्याने सर्व सोन्याची नाणी एका घागरीत ठेवली आणि त्यात वरून बिया टाकल्या. जेणेकरून संपूर्ण मडक्यात फक्त बिया आहे असे दिसत होते. हे भांडे घेऊन तो कुमारच्या घरी गेला. मी माझ्या कुटुंबासह तीर्थयात्रेला जात असल्याचे त्याने कुमारला सांगितले. मला एक वर्ष लागेल, मी परत येईपर्यंत हे भांडे तुमच्याकडे ठेवा असं म्हणाला.
 
कुमारने मडकं सोबत ठेवल्या. एक वर्ष उलटले पण भरत तीर्थयात्रेहून परतला नाही. भांड्यात काय आहे हे जाणून घेण्यासाठी कुमारने संपूर्ण भांडे रिकामे केले.
 
जेव्हा त्याला मडक्यात तळाशी सोन्याची नाणी सापडली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्याने सर्व सोन्याची नाणी घेतली. यानंतर त्यांनी बाजारातून नवीन बिया आणून मडकं भरून दिलं. काही दिवसांनी भरत तीर्थयात्रेहून परतल्यावर त्याने कुमारला त्याचे भांडे मागितले.
 
कुमारने त्याला ते मडकं दिले. भरताने घागरीत सोन्याची नाणी न पाहता कुमारकडे सोन्याची नाणी मागायला सुरुवात केली.
 
कुमारांनी त्याला नकळत विचारले की तू मला बियांनी भरलेला एक घागरी दिली होती त्यात सोन्याची नाणी दिली नव्हती. भरत कुमारला घेऊन तेनाली रमणकडे आला. त्याने झालेला सर्व प्रकार सांगितला.
 
तेनाली रमणने मडक्यातील बिया पाहिल्या आणि सांगितले की, दीड वर्षांपूर्वी तू कुमारकडे मडकं सोडलं होत पण या बिया नवीन दिसत आहेत. कुमारने तुझ्या घागरीतून सोन्याची नाणी काढली आणि बाजारातून आणून त्यात नवीन बिया टाकल्या.
 
कुमार अजूनही तेनाली रमणला नकार देऊ लागला की त्याने सोन्याची नाणी काढली नाहीत. तेनालीने कुमारला सांगितले की आता तुम्हाला १०००० सोन्याची नाणी भरताला परत करावी लागतील.
 
हे ऐकून कुमार आश्चर्याने म्हणाले की अरे पण का? मडक्तयात तर 5000 नाणीच होत्या. असे बोलल्यामुळे त्याने सोन्याची नाणी चोरल्याचे उघडकीस आले. भरतने तेनाली रमणच्या हुशारीचे कौतुक केले.