पोपटाचा मृत्यू : अकबर बिरबल कथा

Last Modified सोमवार, 28 डिसेंबर 2020 (15:58 IST)
एकदा बादशहा अकबर एका व्यापारी कडून पोपट विकत घेऊन आले. तो पोपट दिसायला देखणा होता आणि फार गोड बोलायचा. अकबरांनी त्याच्या संरक्षणासाठी एक नोकर ठेवला आणि त्याला सक्त ताकीद दिली की जर का हा पोपट मेला तर तुला मी मृत्यू दंड देईन आणि या शिवाय जर कोणी असे सांगितले की हा पोपट मेला आहे तर त्याला देखील मृत्यू दंड दिले जाईल. म्हणून त्या पोपटाला व्यवस्थित ठेवा.
नोकर त्या पोपटाला घेऊन गेला आणि मोठ्या उत्साहाने त्याचा सांभाळ करू लागला. त्याच्या मनात ही भीती सतत होती की जर हा पोपट मेला तर त्याला बादशहा जीवे निशीच करतील. आणि झाले असेच की एके दिवशी तो पोपट मेला.

आता त्या नोकराला भीती वाटू लागली त्याला बादशहा ची गोष्ट लक्षात आली. तो धावत धावत बिरबलाकडे गेला आणि त्याला घडलेले सर्व सांगितले.

बिरबलाने त्याला पाणी पाजले आणि म्हणाले - ' काळजी करू नकोस, मी बादशहाला सांगेन तू सध्या त्या पोपट्या पासून लांब राहा. थोड्या वेळ नंतर बिरबल बादशहाकडे गेले आणि त्यांना म्हणाले की - ' बादशहा आपला जो पोपट होता.. आणि एवढे म्हणून बिरबलाने आपली गोष्ट अर्धवट सोडली. बादशहा - एकाएकी सिंहासनातून उभे राहिले आणि विचारू लागले की काय झाले त्याला ? तो मेला का?

बिरबल म्हणाले की -' मी एवढेच म्हणू इच्छितो की आपला पोपट तोंड देखील उघडत नाही, काही खात नाही, पितं नाही, हालत नाही, फिरत देखील नाही. त्याचे डोळे बंद आहे. आणि तो आपल्या पिंजऱ्यात झोपलेला आहे आपण स्वतः त्याला बघावे'.
अकबर आणि बिरबल पोपटाजवळ गेले आणि बघतात तर काय 'ते एकाएकी ओरडले की' अरे हा पोपट तर मेला. बिरबल हे आपण मला त्याच वेळी सांगायला पाहिजे होते.' त्याला सांभाळणारा कुठे आहे ? मी आत्ताचा त्याला मृत्यू दंड देतो'.

बिरबल म्हणे 'बादशहा मी त्याला आपल्या समोर हजर करतो पण आपण हे सांगा की मृत्यू दंड देण्यासाठी कोणाला बोलवू? 'म्हणजे काय' अकबर ने विचारले.

बादशहा आपणच म्हटले होते की जो कोणी असे म्हणेल की पोपट मेला आहे तर त्याला शिक्षा दिली जाईल, आणि थोड्या वेळा पूर्वीच आपण आपल्या तोंडून हे म्हणाला की पोपट मेला. आता अकबराला आपली चूक कळली.
बिरबलाच्या चातुर्याने अकबर हसू लागले आणि ते दोघे हसत हसत दरबारात गेले. अकबराने ताबडतोब घोषणा केली की आता या नोकराविरोधात कोणती ही कारवाई केली जाणार नाही. पोपट स्वतःने मरण पावला आहे, त्या मध्ये कोणाचा ही काहीच दोष नाही.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली ...

आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार
राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती ...

कढीतील शेवग्याच्या शेंगा

कढीतील शेवग्याच्या शेंगा
चार ते पाच शेवग्याच्या शेंगाची तुकडे करून मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेऊन चाळणीवर 10 ते ...

रागीट स्वभावाच्या जोडीदाराला या प्रकारे करा हँडल

रागीट स्वभावाच्या जोडीदाराला या प्रकारे करा हँडल
कधी-कधी राग येणे काळजीचे कारण नाही परंतू राग स्वभावातच असेल तर त्याचा प्रभाव नात्यांवर ...

भगवान बुद्धांच्या काही प्रेरक गोष्टी अमृताची शेती

भगवान बुद्धांच्या काही प्रेरक गोष्टी अमृताची शेती
एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एका शेतकऱ्याकडे गेले. तथागत स्वतः भिक्षा मागण्यास ...

भगवान बुद्धांच्या काही प्रेरक गोष्टी परिश्रम आणि धैर्य

भगवान बुद्धांच्या काही प्रेरक गोष्टी परिश्रम आणि धैर्य
एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह गावात उपदेश देण्यासाठी जात होते. त्यांना त्या गावाच्या ...