रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (11:32 IST)

How To Store Pickles लोणचं साठवण्यासाठी काही महत्वाच्या टिपा, पावसाळ्यात मुळीच खराब होणार नाही

pickle
मान्सूनने दार ठोठावले आहे. या हंगामात मसाले आणि स्वयंपाकघरातील वस्तू खराब होऊ लागतात. लोणचे देखील त्यापैकी एक आहे. लोणचे हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेवणासोबत याचे सेवन केल्याने चव आणखी वाढते. जर घरांमध्ये भाजी नसेल तरी साधी पोळी किंवा पराठ्यासोबत लोणचे खाऊ शकता. लोणच्याची बरणी भरली की ती बराच काळ वापरता येते. पण ते व्यवस्थित साठवले नाही तर ते खराब होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे या ऋतूमध्ये लोणचे खराब होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल....
 
काचेच्या बरणीत ठेवा
तुम्ही लोणचे एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवा. लोणचे प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही धातूमध्ये खराब होऊ शकते, कारण लोणची या धातूंवर प्रतिक्रिया देते आणि लोणचे कडू होऊ लागते. म्हणून, आपण ते फक्त काचेच्या कंटेनरमध्ये ठेवावे.
 
लोणच्यात तेल आणि मीठ घाला
लोणच्यामध्ये मीठ आणि तेल देखील घालावे. अनेक स्त्रिया लोणच्यामध्ये तेल कमी वापरतात, कारण जास्त तेल आरोग्यासाठी हानिकारक असतं. पण तुम्हाला माहित आहे का की मीठ हे प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही काम करते. लोणच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असेल तर ते कोरडेही होणार नाही आणि खराब होणार नाही. यासाठी लोणच्यामध्ये तेल टाकून सूर्यप्रकाश चांगला द्यावा.
 
बरणीच्या झाकणाला कापड लावावे
ओलाव्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. इतकेच नाही तर कधी कधी घट्ट डब्यात लोणचे ठेवल्यानंतरही ओलावा येतो. त्यामुळे लोणच्याच्या डब्याचे झाकण घट्ट बंद करुन त्यावर कापड लावावे. असे केल्याने लोणच्यामध्ये ओलावाही येणार नाही.
 
लोणच्यातून चमचा काढा
अनेक स्त्रिया अनेकदा लोणच्यामध्ये चमचा टाकून विसरुन जातात. त्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे चमचा स्टीलचा आहे आणि याच्या संपर्कात येऊन तुमचे लोणचे खराब होऊ शकतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला लोणचे बाहेर काढायचे असेल तेव्हा स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. याशिवाय हात देखील स्वच्छ आणि कोरडे असताना लोणचे काढावं.