शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : शनिवार, 23 जुलै 2022 (15:25 IST)

Paneer Lover बहुतेक लोक पनीर चुकीच्या पद्धतीने खातात, ते कसे खावे जाणून घ्या, ज्याने अधिक फायदा होईल

Most people eat cheese in the wrong way
पनीर ही एक अशी डिश आहे, जी आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण चवीलाही खूप चविष्ट आहे. पनीर खायला आवडणार नाही असा क्वचितच शाकाहारी असेल. पनीरबाबत लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न असतो की ते खाण्याची योग्य पद्धत कोणती?
 
पनीरमध्ये अनेक पोषक घटक असतात
पनीर कच्चे खावे की भाजून घ्यावे असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला पनीरचे सेवन कसे करावे ते सांगत आहोत. आहारतज्ञांच्या मते पनीरमध्ये पोषक तत्वे खूप जास्त असतात आणि कॅलरीज कमी आढळतात. यामुळेच पनीरच्या सेवनाने शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
 
स्वयंपाक केल्याने काही पोषक तत्वे नष्ट होतात
आहारतज्ज्ञांच्या मते तुम्ही पनीर कच्चे किंवा शिजवलेले खाऊ शकता. दोन्ही प्रकारे पनीर खाण्यात काहीही नुकसान नाही. मात्र जर तुम्ही पनीर शिजवून खाल्ले तर त्यातील काही पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा कमी फायदा होईल.
 
हाडे मजबूत होतात
तज्ज्ञांच्या मते पनीर प्रोटीनची खाण आहे. त्यात चांगले फॅट्सही आढळतात. याच्या नियमित सेवनाने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहते. यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. तसेच वजनही नियंत्रणात राहते.
 
पॅक्ड पनीर खाण्यापूर्वी स्वच्छ करा
आहारतज्ञांच्या मते, जर तुम्ही स्वतः दुधापासून घरी पनीर बनवत असाल किंवा डेअरीतून बनवलेले कॉटेज चीज आणले असेल तर तुम्ही ते कच्चेही खाऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही दुकानातून पॅक्ड पनीर घेतले असेल तर ते कच्चे खाण्यापूर्वी थोडावेळ कोमट पाण्यात टाका. याचे कारण असे की अनेक दिवसांपूर्वी बनवल्यामुळे त्यावर घाण किंवा बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. काही वेळ कोमट पाण्यात ठेवल्यानंतर तुम्ही पनीर बाहेर काढून वापरू शकता.