बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (12:12 IST)

सगळं सुरळीत असूनही अपसेट वाटतं असेल तर हे करा

रिलेशनशिपमध्ये लहान-सहान वाद आणि भांडणं होत असतात परंतु वारंवार वाद घडत असतील किंवा आपल्याला नात्यात काही आनंदी वाटत नसेल तर जरा थांबा आणि खोल श्वास घेऊन विचार करा. स्वत:चा आणि समोरच्याचा वेळ वाया न घालवता हे करा- 
 
पार्टनरसोबत चर्चा
सर्वात आधी पार्टनरशी मोकळेपणाने बोला की नात्यात काय कमी पडत आहे.भविष्याबद्दल स्वत:ला विचार आणि नात्याचं भविष्य काय आहे, केवळ लिव्हइनमध्ये राहणे की विवाहात अडकणे. आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. पार्टनरला देखील याबद्दल क्लिअर विचारा.
 
सरप्राइज पार्टी किंवा गिफ्ट 
जर पार्टनरला किंवा आपल्याला पार्टी किंवा गिफ्ट दिल्यावरही आनंद होत नसेल तर आपण आपला वेळ वाया घालवत आहात. हे नातं फार काळ टिकून राहील हे स्पष्ट संकेत आहे.
 
गिल्ट 
कधी-कधी नकळत काही घडू जातं आणि नंतर त्याबद्दल गिल्ट वाटू लागतं. शक्य आहे आपल्याकडून देखील काही चूक घडली असेल आणि आता गिल्ट आपल्याला आनंदी होऊ देत नसेल. अशात पार्टनरशी बोलणं चांगला पर्याय ठरेल.