गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (12:35 IST)

जेव्हा बायको नवर्‍याला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन गेली

Husband Wife Joke
मध्यंतरी बंडु आणि त्याची बायको शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांच्या हॉस्पिटलबाहेर भेटले. 
मी सहज विचारले कोणासाठी ? 
तेव्हा वहिनी म्हणाल्या: यांच्यासाठीच हो, सारखे-सारखे "देश डबघाईला आला आहे", "बेरोजगारी वाढली आहे"" "भविष्य अंधारमय आहे" असं काहीतरी म्हणत असतात. 
मी म्हंटलं, "एवढं गंभीर नाही हे पण दाखवून घ्या."
पुढे काही दिवसांनी बंडुची भेट झाली तेव्हा बरा वाटला. मी  विचारलं , "काय औषध दिले डॉक्टरांनी ? "
तो म्हणाला काही नाही, थोडे दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.