मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (11:36 IST)

शहीद दिवस : कसें विसरावे बलीदान तुमचे

कसें विसरावे बलीदान तुमचे,
भारत मातेवरचे प्रेम तिघांचे,
गेलात फासावर तुम्ही हसत,
स्वतंत्र भारता जणू तुंचर व्रत,
फेडावे पांग तुमचे आम्ही तुमचे,
गर्वाने तुम्हांसमोर मस्तक झुकते आमुचे,
हे वीर पुत्रांनो,धन्य आहे ही भारत माता,
तुमच्या मुळेच मिळाली तिजला स्वतंत्रता,
काळजावर कोरून ठेवू हा दीन सदा,
नमेल शीस आमचे ,श्रद्धेने सर्वदा !
.....आज शहीद दिवस... 
अश्विनी थत्ते.