रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (21:35 IST)

प्रेम कविता : प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते

प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते.
त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते.
त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते.
तो 'हो' म्हणेल की नाही" या विचारात रात्र घालवावी लागते..
त्याच्या साथी गुलाब तोड़ताना काट्या नि घायाळ व्हावे लागते.
इश्काची आग, त्याच्या नकळत | त्याच्या ह्रुदयात ही पेट्वावी लागते.
प्रेम आपले त्याच्या वर असले तरी त्याचे दुसर्या वर असू सकते
अणि जर दुर्दैवाने तसे निघाले तर
विरह गीत लिहायची तयारी असावी लागते. -

विंदा करंदीकर