1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ.मुं.शिंदे

PR
सासवड येथे होणार्‍या 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फ.मुं.शिंदे (फकीरा मुंजाजी शिंदे) यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत एकूण 904 मतांपैकी फ मुं शिंदेंना 460 मते मिळाली. साहित्यिका प्रभा गणोरकर यांना 331 मते मिळाली. अन्य दोन उमेदवार अरूण गोडबोले आणि संजय सोनावणी यांना अनुक्रमे 60 आणि 39 मतांवर समाधान मानावे लागले.

शिंदेंच्या रुपात डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यानंतर मराठवाड्याला पुन्हा एकदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. दरवर्षी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद रंगतात. मात्र यंदा वाद न रंगल्यामुळे निवडणुकीचा फारसा धुरळा रंगलाच नाही.

WD
औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यपक होते, 2002 मध्ये ते निवृत्त झाले आहेत. 'आई एक गाव असतं' ही त्यांची लोकप्रिय कविता आहे. शिंदेच्या नावावर 27 कविता संग्रह आणि इतरही विपूल लेखण सामुग्री त्यांनी केले आहे. त्यांच्या राजकीय वात्रटीका प्रसिद्ध आहेत.

'अध्यक्षपदीचा मिळालेला सन्मान हा मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो, असे फ.मुं.नी निवडीनंतर सांगितले. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते, त्यामुळे मी माझे हे यश पत्नीला समर्पित करतो.' असेही शेवटी फ.मुं.नी सां‍गितले.