शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

दत्तो वामन पोतदार

WD
महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी चालू शतकातील चालता-बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार! आज त्यांच्या जन्मदिन. 5 ऑगस्ट 1890 रोजी महाडजवळील बीरवाडी येथे त्यांचा जन्म झाला. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या पोतदारांनी मराठ्यांच्या इतिहासालाच आपले जीवनसर्वस्व मानले होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, मराठी साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी, राष्ट्रभाषा प्रचार समिती अशा अनेक संस्थांशी ते संबंधित होते.

मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास, संशोधन आणि व्यासंग याला वाहून घेतलेल्या पोतदारांनी ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’,‘विविध दर्शन’, ‘मी युरोपात काय पाहिले’,‘शिवचरित्राचे पैलू’ यांसारखे ग्रंथ लिहिले. हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी दिली, तर केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ या पदवीने गौरविले. 1933 ते 36 या काळात ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चे संपादन करणारे पोतदार 1939 मध्ये अहमदनगर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. 6 ऑक्टोबर 1979 रोजी ते अनंतात विलीन झाले.