गरोदरपणात नाभीत वेदना होत असल्यास घरगुती उपाय जाणून घ्या
गरोदरपणात गर्भाशायावर दबाव पडल्याने नाभीत वेदना सुरु होतात. अर्भकाचा आकार वाढत असताना नाभीशिवाय शरीरातील इतर काही अंगावरचा दबाव सुद्धा वाढतो. साधरणत: गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये नाभीवर दबाव पडायला सुरुवात होते. यात नाभीत वेदना, खाज यांसारख्या समस्या उत्पन्न होतात.
गरोदरपणात संपूर्ण शरीरावर मोठा दबाव पडतो ज्यामुळे पोटाच्या स्नायू आणि त्वचेवर अधिक प्रभाव पडतो शिवाय इतर अंगावर देखील ताण जाणवतो. हा ताण नाभीत वेदनेला कारणीभूत ठरू शकतो. सामन्यत: हा त्रास केवळ शारीरिक बदलामुळे होतो. यामुळे कुठलीही गंभीर समस्या उद्वण्याचा प्रकार नसतो पण वेदना कमी किंवा तीव्र असू शकतात.
उपाय
जर नाभीत वेदना होत असतील तर एका कुशीवरच झोपा. मेटरनल सपोर्ट बेल्ट देखील वापरु शकता. नाभीत खाज सुटत असल्यास खावजणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन लोशन वापरावे. खाजवल्याने आपल्या त्वचेला तसेच बाळाला नुकसान पोहचू शकतं. या समस्येवर घरगुती उपचार म्हणजे कोको बटर वापरावे. टी-ट्री तेलाचा सुद्धा वापर करू शकता. याने खाज कमी होते. तसेच सैल सुती कपडे परिधान करावे.