बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : रविवार, 25 डिसेंबर 2022 (10:18 IST)

Christmas Celebration Ideas:मुलांसाठी ख्रिसमस खास आणि संस्मरणीय बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Christmas Party Ideas: ख्रिसमस जवळ येत आहे. ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण ख्रिसमस दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.जगातील अनेक देश नाताळ सण साजरा करतात. ख्रिसमस अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. त्याला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणतात. या दिवसापासून रात्र लहान होऊन दिवस मोठा होतो. याशिवाय हा वर्षातील शेवटचा मोठा सण आहे.
 
ख्रिसमससाठी मुले खूप उत्सुक असतात. असे मानले जाते की या दिवशी सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू आणतात. मुले सांताक्लॉजची वाट पाहत असतात. हिवाळी सुट्ट्या या दिवसापासून सुरू होतात, म्हणूनच मुले 25 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत असतात.मुलांसाठी ख्रिसमसचा दिवस संस्मरणीय आणि अधिक मनोरंजक बनवायचा असल्यास या काही टिप्स अवलंबवा 
 
1 ख्रिसमस ट्री एकत्र सजवा-
ख्रिसमस ट्रीशिवाय ख्रिसमसचा दिवस अपूर्ण आहे. त्यामुळे ख्रिसमस डे साजरा करण्यासाठी मुलांसोबत ख्रिसमस ट्री सजवा. लहान मुले मोठ्या उत्साहाने ख्रिसमस ट्री सजवतील आणि तेही या कामात गुंतले जातील. ख्रिसमस ट्री सजविण्यासाठी तुमच्या मुलाला तसेच आजूबाजूच्या मुलांचा समावेश करा. सोसायटीसाठी एक अप्रतिम ख्रिसमस ट्री तयार केला जाऊ शकतो, जिथे संध्याकाळी मुलांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित केली जाऊ शकते.
 
2 ख्रिसमस केक बनवा-
सणाच्या निमित्ताने काही गोड पदार्थ तयार केले जातात. ख्रिसमसच्या निमित्ताने मुलांसाठी केक बनवू शकता. ख्रिसमस केक बनवणे देखील सोपे आहे. केक बनवताना लहान मुलांची मदत घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते देखील केक बनवण्याचा आनंद घेतील. संध्याकाळी मुलांसोबत ख्रिसमस केकचा आनंद घ्या.
 
3 भेटवस्तू द्या -
ख्रिसमसच्या प्रसंगी, सांताक्लॉज मुले झोपी गेल्यानंतर त्यांच्यासाठी भेटवस्तू देतात. भारत असो किंवा इतर कोणताही देश, सर्वत्र मुले ही कथा ऐकत आहेत आणि सांताक्लॉज त्यांच्यासाठीही भेटवस्तू घेऊन येतील अशी आशा बाळगून असतात. मुलांची आशा बनवून ठेवा. ख्रिसमसला त्यांना सरप्राईज गिफ्ट द्या. तुम्ही त्यांची भेट ख्रिसमसच्या झाडाजवळ किंवा मुलाच्या उशाजवळ ठेवू शकता. अचानक मुलाला स्वतःसाठी भेटवस्तू पाहून खूप आनंद होईल. तुम्ही बजेटमध्ये भेटवस्तू देऊ शकता, भेटवस्तू महागच असावी असे नाही.मात्र भेटवस्तू देणं म्हह्त्वाच आहे. 
 
4 मुलांना प्रोत्साहन द्या -
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सणाच्या निमित्ताने तुमच्या मुलाला असे काहीतरी करण्यास प्रोत्साहित करणे जे त्यांच्यासाठी माणुसकीचा धडाही ठरू शकेल आणि ज्यामुळे त्यांना आनंद वाटेल. त्यामुळे नाताळच्या दिवशी तुमच्या घरातील मदतनीस, रक्षक किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लहान गरीब मुलांना भेट द्या. तुमच्या मुलाला त्या गरीब मुलांशी जोडा आणि त्यांना भेटवस्तू किंवा जीवनावश्यक वस्तू देऊन कोणत्याही गरीबाचा सण चांगला बनवा. जेव्हा तुमच्यामुळे एखाद्या लहान गरीब मुलाच्या चेहऱ्यावर हसू येईल त्याचे समाधान वाटेल आणि मुलांना प्रोत्साहन मिळेल.
 
Edited by - Priya Dixit