शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

हे उपाय केल्याने त्वरीत पळून जातील माशा

घरातील झाडांना अतिप्रमाणात पाणी घालू नका.
धूपसोबत कापूर जाळून घरात फिरवा किंवा कापराच्या गोळ्या घरातील चारी कोपर्‍यात ठेवा.
घरात तुळशीचे रोप लावल्याने माश्यांचा वावर कमी होतो.
नीलगिरी, लॅव्हेंडर, पेपरमिंट, आणि यासारखी नैसर्गिक तेलांनी फायदा होईल. घरात तेल शिंपडावे किंवा तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून हवाबंद डब्ब्यात ठेवा. अधिक माश्या असतील तेथे हा डबा उघडा करून ठेवा.
घरात झेंडूचे फूल ठेवावे. झेंडूच्या फुलांच्या वासाने माश्या दूर होतात.


 
लवंगाच्या वासाने माश्या दूर होतात. लिंबू कापून त्याला 5-6 लवंगा टोचून माश्या असलेल्या जागी ठेवू शकतात.
दा‍लचिनीचा वासाने माश्या पळतात. घरात दालिचिनीचे तुकडे किंवा पावडर कोपर्‍यात टाकून ठेवू शकता.
कचर्‍यावर काकडी कापून ठेवल्याने माश्या दूर पळतात.