ऑगस्टमध्ये कोल इंडियाचा आयपीओ
कोळसा खाण क्षेत्रातील कंपनी कोल इंडियाचा आयपीओ ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारात लॉंच होणार आहे. अमेरिकेच्या पीबाडी एनर्जी कॉर्पोरेशनमध्ये कोलला भागिदारी घ्यायची असून, या माध्यमातून कोल 120 अब्ज रुपये जमवणार आहे. कोल इंडियाचे अध्यक्ष पार्थ भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात आयपीओ आणण्याची तयारी सुरू असून, यासाठी अनेक बँकांशीही चर्चा केली जात आहे. पीबाडीने कोलशी भागिदारी करण्यास उत्सुकता दाखवली आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियातील काही कंपन्यांचेही अधिग्रहण केले जाणार असल्याचे भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे.