रविवार, 29 जानेवारी 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

चिमूटभर मीठ बनवू शकतं मालामाल, वास्तु विज्ञान

मीठ अन्नाला चव देतं तसंच वास्तु विज्ञानामुळे मीठ आपलं जीवन देखील आनंदी बनवू शकतं. वास्तुप्रमाणे मिठात गजबची शक्ती असते याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील सुख समृद्धी वाढते. म्हणून मीठ केवळ चवीसाठी नाही तर याचे इतर उपाय करून देखील सुखात भर घालता येऊ शकते.
 
मिठाला नेहमीच नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले गेले आहेत. म्हणून मिठा वाईट दृष्ट काढण्यासाठी केलं जातं. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घराला दृष्ट लागल्याचे जाणवत असल्यास चिमूटभर मीठ तीन वेळा ओवाळून बाहेर फेकून द्यावे. याने नजर दोष नाहीसा होतो.
 
वास्तु विज्ञानाप्रमाणे काचेच्या बॉऊलमध्ये मीठ भरून शौचालय आणि स्नान गृहात ठेवावे याने वास्तुदोष दूर होतं. याचे कारण म्हणजे मीठ आणि काच दोन्ही राहूच्या वस्तू असल्याने अशा प्रकारे राहूचं नकारात्मक प्रभाव दूर करण्यात मदत मिळते. राहूला नकारात्मक ऊर्जा आणि कीटक व कीटाणूंचा कारक मानले गेले आहे. आणि यामुळे घरातील सुख- समृद्धी आणि आरोग्यावर प्रभाव पडतो.
 
काचेच्या बरणीत मीठ भरून घराच्या कोपर्‍यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. राहू, केतूची दशा सुरू असल्यास मनात वाईट विचार तसेच भीती निर्माण होते अशावेळी हा प्रयोग अत्यंत लाभदायक ठरतो.
 
मिठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दाराला बांधल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही. व्यवसायात प्रगतीसाठी प्रतिष्ठानच्या मुख्य दारावर आणि तिजोरीवर अशी पोटली बांधून लटकवणे योग्य ठरेल. 
 
रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून हात पाय धुण्याने ताण दूर होतो आणि चांगली झोप येते. राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव देखील याने दूर होतो.
 
घरात सकारात्मक ऊर्जेत वृद्धीसाठी रॉक साल्ट लँप ठेवू शकतात. वास्तु विज्ञानानुसार हे कौटुंबिक जीवनात आपसात मिळून-जुळून राहण्यात तसेच सुख समृद्धी वाढवण्यात सहायक असतं. आरोग्यासाठी देखील हे सकारात्मक ठरतं. 
 
घरातील सुख मुलांमुळे असतं. मुलं आजारी असल्यास पूर्ण कुटुंब परेशान होतो. अशात मुलांना दृष्ट लागू नये आणि ते निरोगी राहावे यासाठी आठवड्यातून एक दिवस अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून मुलांना त्या पाण्याने अंघोळ घालावी.