घरात लावले असे फोटो तर होणार नाही पैशांची तंगी
घर सजवण्यासाठी आम्ही बर्याच प्रकारचे फोटो लावतो जे बर्याच वेळा आमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात. तसेच जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घरात फोटो लावाल तर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल आणि घरात खुशहाली येईल. वास्तुशास्त्रानुसार जर घरात हंसाचा फोटो लावला तर पैशांची कमी कधीच येणार नाही. असेच बर्याच काही गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहे ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल :
वास्तुशास्त्रानुसार घरात देवी देवतांचे फोटो लावल्याने सर्व अडचणी दूर होण्यास मदत मिळते आणि घरात सुख शांती कायम राहते.
घरात समुद्र किनार्यावर धावत असलेले 7 घोड्यांचे फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून जातो.
घराच्या बैठकीत हंसाचे मोठे मोठे फोटो लावणे उत्तम मानले जाते यामुळे घरात पैशांची तंगी येत नाही.
पर्वत किंवा उडत असलेल्या पक्ष्यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते. असे फोटो लावल्याने विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि आत्मविश्वास वाढतो.
स्वयंपाकघरात फळ आणि भाज्यांचे चित्र लावल्याने घरात सदैव बरकत असते.