शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:01 IST)

जर आपल्याला सारखा सारखा राग येत असेल तर हे उपाय करा

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. राग आणि असहिष्णुता हे क्षणिक आवेश असतात आणि ते नेहमीच पश्चात्ताप करून संपतात. जर तुम्हाला सारखा सारखा राग येत असेल किंवा मनात नकारात्मक विचारांचा प्रवाह होत असेल तर काळजी घ्या. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आपल्याला राग आणि मानसिक विकार आणत आहे. वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय आहेत ज्यात राग व आवेशावर मात करता येते. या उपायांचे पालन केल्यास आपण स्वत:ला मानसिकरित्या शांत आणि एकाग्रचित अनुभवाल.
 
जर लहान सहानं गोष्टीवर राग येत असेल तर हनुमानाची पूजा करावी. हनुमानाला गूळ किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करा. दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. 
 
घरात तुळशीचे रोप लावावे. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. 
 
आपल्या घरात किंवा कामाच्या क्षेत्रात जर आपल्याभोवती घाण असेल तर आपला रागदेखील वाढवतो. अशात आपले घर किंवा प्रतिष्ठानाच्या स्वच्छतेही विशेष काळजी घ्या. 
 
घरात मकडीचे जाळे ठेवू नका. अन्नाचा अनादर होऊ देऊ नये याची काळजी नेहमी घ्या. 
 
घरात किंवा प्रतिष्ठानात लाल रंगाचा वापर केल्याने रागही वाढतो. अशा परिस्थितीत लाल रंग वापरू नका. 
 
घराच्या पूर्व दिशेने जड वस्तू ठेवू नका. दररोज थोडा वेळ शांत राहण्याचा प्रयत्न करा.
 
सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा. सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंगळवारी हरभरा पीठ आणि मसाले दान केल्यास राग शांत होतो. दक्षिणेकडे तोंड करून अन्न ग्रहण करू नका.