मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (14:48 IST)

घरात सुख-शांतीसाठी काही वास्तू टिप्‍स

जर तुम्ही तयार घर किंवा फ्लॅट विकत घेत असाल तर वास्तू संबंधित काही गोष्टींकडे लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे.
 
बर्‍याच वेळा असे ही होते की तुम्ही बरंच वेळ पूजा करण्यात घालवता, पण त्याचे चांगले फळ मिळत नाही, अशात तुम्ही तुमच्या घरात वास्तुशास्त्राकडे लक्ष्य द्या. याचे काही टिप्स देत आहोत जे फार साधारण आहे पण तुम्ही त्याच्या वापर करून घरात सुख-शांती बनवण्यास नक्कीच यशस्वी होऊ शकता.
 
घराचे मुख्य दार
घराचे मुख्य दार दक्षिण मुखी नको. हे चेक करण्यासाठी तुम्ही चुंबकीय कंपास घेऊन जायला पाहिजे. जर तुमच्याजवळ इतर विकल्प नसतील तर दारासमोर मोठा आरसा लावा, ज्याने नकारात्मक ऊर्जा दारातून परत जाईल.
 
ॐ ची आकृती
घराच्या प्रवेश दारावर स्वस्तिक किंवा ॐ ची आकृती लावा. यामुळे परिवारात सुख शांती कायम राहील.
 
कलश ठेवा
घरच्या पूर्वेकडे पाण्याचा कलश ठेवा. यामुळे घरात समृद्धी येते.
 
खिडकी दार
घराचे खिडकी दार असे असायला पाहिजे की सूर्याचा प्रकाश जास्तीत जास्त वेळेसाठी घरात यायला पाहिजे. यामुळे घरातील आजार दूर जातात.
 
ड्रॉइंग रूम 
कुटुंबात कटकटीपासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये अर्थात बैठकीत फुलांचा गुलदस्ता लावा.
 
किचन
किचन मध्ये पूजेची अलमारी किंवा मंदिर नाही ठेवायला पाहिजे.
 
बेडरूम
बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर, फोटो किंवा धार्मिक आस्थेशी निगडित वस्तू नाही ठेवायला पाहिजे. बेडरूमच्या भिंतींवर पोस्टर किंवा फोटो नाही लावायला पाहिजे. आणि जर तुमची इच्छा असेल तर प्राकृतिक सौंदर्य दर्शवणारे फोटो लावू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल, नवरा बायकोमध्ये विवाद होत नाही.
 
देवस्थान 
घरात शौचालयाच्या बाजूला देवघर नको.
 
मास्‍टर बेडरूम 
घरातील मुख्य व्यक्तीचे बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेत चांगले मानले जाते.
 
शौचालय
घरात शिरल्याबरोबर शौचालय नसायला पाहिजे.