रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

ब्रेडची चकली

ND
साहित्य : 1 मोठी ब्रेड, 2 बटाटे मोठे, 2 चमचे तांदुळाचे पीठ, जिरे, ओवा, तीळ, तिखट, मीठ, हळद, तेल तळण्यासाठी, कोथिंबीर.

कृती : प्रथम बटाटे उकडून, साल काढून बारीक करावेत. ब्रेडचे स्लाइसेस कोमट पाण्यात बुडवून हाताने दाबून पाणी काढावे व मऊ करावेत. बटाट्याच्या मऊ केलेल्या गोळ्यात ब्रेडचे मऊ केलेले स्लाइसेस, तांदुळाचे पीठ, ओवा, जिरे, तीळ, तिखट, मीठ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण चांगले मऊ करून गोळा करावा. कढईत तेल गरम करून मंदाग्नीवर चकलीच्या साच्याने चकल्या तळाव्यात. ब्रेडमुळे चकली खुसखुशीत होते.