मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (09:47 IST)

Carrot Soup थंडीत गाजराचे सूप प्या, सोपी रेसिपी जाणून घ्या

Carrot Soup सूप केवळ स्वाद किंवा पोट भरण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषकरुन हिवाळ्यात सूप पिणे फायद्याचं असतं. आज आपण गाजाराचे सूप कसे तयार करतात हे बघूया... यात स्वाद वाढवण्यासाठी काही साहित्य यात मिसळून गरमागरम सूप तयार करुया...
 
साहित्य- 1 चमचा लोणी, 1 चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑयल, एक चिरलेला कांदा, चिमूटभर ओवा, 2 लवंगा आणि 2 लसूण, 5 चिरलेले गाजर, 2 कप पाणी, 4 कप व्हेजिटेबल शोरबा, ½ लहान चमचा मीठ, स्वादानुसार काळी मिरपूड
 
गाजर सूप तयार करण्याची कृती
ओव्हनमध्ये किंवा गॅसवर बॉऊलमध्ये लोणी घालून त्या कांदा आणि ओवा घाला, उकळून घ्या. लसूण घाला आणि परतून घ्या. गाजर घालून मिसळा. पाणी आणि शोरबा घाला आणि उकळी येऊ द्या. 20 मिनिटे शिजवून बंद करा. गार झाल्यावर ब्लेंडरमध्ये प्यूरी तयार करा. प्यूरी हवं तितकं पाणी घालून मीठ, मिरपूड घालून पुन्हा गरम करा आणि मग सर्व्ह करा.