रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (14:32 IST)

Chat Masala Recipe : हा चाट मसाला फळे आणि सॅलड्सची चव वाढवेल, घरी सहज तयार करा

मसालेदार चाट मसाला फळे आणि सॅलडवर टाकल्यास त्याची चव आणखी वाढते. बरेच लोक बाजारातील चाट मसाला वापरतात, पण आज आम्ही तुम्हाला अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी चाट मसाला घरी बनवण्याची रेसिपी सांगत आहोत. काळे मीठ आणि आमचूर पावडर यांसारख्या घरगुती मसाल्यांनी बनवू शकता. त्याचा सुगंध इतका दरवळतो की आपण ज्या डिशवर टाकता त्याची चव आणि सुगंध दोन्ही वाढतं. विशेष म्हणजे तुम्ही ते जास्त काळ साठवून ठेवू शकता. हा चाट मसाला बनवायला फक्त ३ मिनिटे लागतात आणि त्यासाठी तुम्हाला जिरे, काळी मिरी, संचल, हिंग, काळे मीठ आणि आमचूर पावडर लागेल.
 
चाट मसाला घरीच बनवा
चाट मसाला बनवायला सुरुवात करण्यासाठी, प्रथम एका रुंद नॉन-स्टिक पॅनमध्ये जिरे टाका आणि मध्यम आचेवर सुमारे 1 मिनिट कोरडे भाजून घ्या.
 
आता ते एका प्लेटमध्ये पसरुन द्या आणि 2-3 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा.
 
आता मिक्सरमध्ये भाजलेले जिरे आणि काळी मिरी घालून बारीक पावडर बनवा.
 
आता जिरे आणि काळी मिरी पावडर चाळणीतून चाळून घ्या
.
आता त्यात आमचूर, काळे मीठ, पांढरे मीठ आणि हिंग घालून मिक्स करा.
 
आपण ते अनेक महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता.
 
हवाबंद डब्यात भरूनही तुम्ही ते बाहेर ठेवू शकता.
 
कोणत्याही फळावर आणि सॅलडवर टाकून तुम्ही ते खाऊ शकता.
 
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणत्याही चाटची चवही वाढवू शकता.