सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (22:35 IST)

Potato Halva Recipe: हिवाळ्यात बनवा बटाट्याचा शिरा, रेसिपी जाणून घ्या

sweet potato
Potato Halva Recipe:हिवाळ्यात गरम पदार्थ खायला आवडतात.काही लोक खवैय्ये असतात. ते नवीन पदार्थ चाखण्यासाठी नवीन ठिकाणी जातात. काहींना भारतीय तर काहींना चायनीज पदार्थ आवडतात. हिवाळ्याच्या हंगामात गरम पदार्थ खालले जातात. हिवाळ्यात बटाट्याचा हलवा खाऊन बघा.आपण हा घरीच बनवू शकतो. हा बनवायला अगदी सोपा आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 

साहित्य-
2 बटाटे 
5-6 बदाम 
1 वाटी साखर 
1 कप दूध 
साजूक तूप 
वेलची पूड 
काजू 
बेदाणे 
 
कृती- 
सर्वप्रथम बटाटे सोलून घ्या.नंतर बटाटे मॅश करून घ्या. एका कढईत तूप घाला.त्यात मॅश केलेले बटाटे घाला. 2 ते 4 मिनिटे शिजवून घ्या. सतत ढवळत राहा. बटाट्यात साखर आणि दूध घालून ढवळत राहा. त्यात वेलची पूड, काजू, बेदाणे, बदाम घाला आणि ढवळा. एक वाफ द्या. बटाट्याचा हलवा खाण्यासाठी तयार. गरम सर्व्ह करा. 
 
 Edited by - Priya Dixit