शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (20:32 IST)

रेसेपी: कांदा भजी

शेफ - संदेश कोरे, व्याख्याता, आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
 
साहित्य: चिरलेला कांदा, बेसन, अजवाइन, जिरे, हळद, तिखट, मीठ
तयारी:
1.एका वाडग्यात कांद्यामध्ये थोडा बेसन घाला (३-४ चमच )
2.आवश्यकतेनुसार १ चमच अजवाइन, जिरे, हळद, तिखट, मीठ घाला.
3.थोडे पाणी घालून मिक्स करा आणि १० मिनीटे बाजूला ठेवा
4.कढईत आधी तेल गरम करा .
5.मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि सोनेरी तपकिरी रंग येईस्तोवर तळून घ्या.
6.तेल झारीने गाळून घ्या. जास्त तेल काढण्यासाठी नॅपकिन्स वापरा.
7.आणि अशा प्रकारे गरम आणि खुसखुशीत भजी तयार होतील.