सर्वभारतात तलावांमध्ये याची वेल येते. कंद आकाराने त्रिकोणी असून, त्याला शिंगासारखे दोन काटे असतात. त्यामुळे या कंदाला संस्कृतमध्ये श्रृंगाटक असं म्हणतात. या कंदाच्या एका जातीत चार कोन आणि काटे असतात. या कंदाची साल हिरवी असून, मगज पांढरे असते. आतल्या मगजात पिष्टमय पदार्थ अमॅगेनीज या क्षाराचं प्रमाण भरपूर असतं. वेलीला पावसाळ्यात फुलं आणि पुढे हिवाळ्यात फळं येतात. हे कंद उकडून खातात. उकडल्यावर ते काळे पडतात. उकडल्यावर ते कंद चिरून आपला पांढरा भाग खाल्ला जातो. या पांढर्या भागांचं पीठही करतात. उपवासाला शिंगड्याच्या पिठात राजगिर्याचं पीठ एकत्र करून पुर्या केल्या जातात.
गुणधर्म शिंगड्याचा कंद मलावरोधक असल्याने अतिसारात त्याचा उपयोग होतो. शिंगड्याचा कंद लघवींच प्रमाण वाढवतो. त्यामुळे लघवी कमी होत असल्यास शिंगाड्याचा वापर आहारात केला जातो. स्त्रियांच्या आरोग्यासाठी शिंगाडा चांगला नाकाचा घोणा फुटण्यसारख्या आजारात पथ्याचा आहार केला जातो.