शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (08:47 IST)

मुंबईत ७८ गोविंदा जखमी :दहिहंडीच्या उत्सवाला गालबोट

dahi handi
यंदाच्या दहीहंडीला गालबोट लागले आहे. थरावर थर रचण्याच्या नादात मुंबईत आत्तापर्यंत ७८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमी गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालायांमध्ये उपचार सुरु आहेत.

खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांकडून थरावर थर रचले जातात. या थऱावरुन कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना कायमचे अपंगत्व येते तर काहींना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे प्रशासनातर्फे या गोविंदांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना राज्यशासनाकडून १० लाख रुपयांचा विमा कवच देण्यात आले आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीनिमित्त “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.