शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (19:14 IST)

मुंबईत फसवणुकीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश, 19 जणांना अटक

arrest
सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढले आहे. मुंबईत परदेशी नागरिकांना फसवून त्यांच्या कडून पैसे मागणाऱ्या दोन बेकायदेशीर कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात 19 जणांना अटक केली आहे. या मध्ये कॉल सेंटरचा मालक, पांच टीम लीडर, सेल्स मैनेजर, आणि ऑपरेटरचा समावेश आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी विदेशी गुंतवणूकदारांना फॉरेक्स ट्रेंडिंग मध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली चांगले परतावे देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे.  

पोलिसांना मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात जेबी नगर आणि कांदिवली पश्चिम भागात काही लोक कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी धाड़ टाकली आणि घटनास्थळावरून 19 जणांना अटक केली. 

हे सर्व आरोपी परदेशी नागरिकांशी सम्पर्क साधत त्यांना गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवायचे काही भोले भाबडे नागरिक त्यांच्या आमिषाला बळी पडले. 
ते फसवणूक करताना व्यावसायिक पद्धतीने बोलायचे त्यात त्यांना गुंतवून गुंतवणूक करूं फसवणूक करायचे. पोलिसांनी या प्रकरणी कॉल सेंटर वर धाड़ टाकत 19 जणांना ताब्यात घेतले आहे. काही अजुन लोक या टोळीचा भाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit