बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (12:57 IST)

मुंबईत इमारतीला आग, एका व्यक्तीने थेट १९ व्या मजल्यावरून उडी मारली

लालबागच्या करी रोड रेल्वे स्थानकाजवळ वन अविघ्न पार्क येथे इमारतीला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 
 
ही आग अत्यंत भीषण होती की जीव वाचविण्यासाठी एका व्यक्तीने थेट इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारली आहे तर काही जण जखमी झाले आहेत. १९ व्या मजल्यावरून उडी मारणार्‍याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
 
अविघ्न पार्क ही ६० मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली आणि आग पसरत असून २५ व्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पसरले आहेत. इमारतीती अनेक लोक अडकून पडले आहेत. यातील काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे मात्र, अजूनही काही कामगार इमारतीच्या आत असल्याचा अंदाज आहे. 
 
लोकांना बाहेर काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहेत. तसंच, पार्किंगपर्यंतही आग पसरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या इमारतीत रहिवाशी जास्त नव्हते. मात्र काही कामगार घटनास्थळी उपस्थित होते.