मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 13 जानेवारी 2025 (16:06 IST)

ठाण्यात अल्पवयीन मुलाने ट्रक चालवून एकाला चिरडले, एक जखमी

arrest
ठाण्यात एका ट्रक चालकाने रिक्षाला दिलेल्या धडक मध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.ट्रक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत होता.  

सोमवारी पहाटे अडीच वाजता शहरातील घोडबंदर रोडवरील सुरज वॉटर पार्क जवळ ही घटना घडली.
या अपघातात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोन रिक्षाला जाऊन धडकला नंतर मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी एका खड्ड्यात जाऊन पडला.

या अपघातात रिक्षा मध्ये प्रवास करणारे स्थानिक रहिवासी जितेंद्र मोहन कांबळे(31) जखमी झाले सून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर दुसऱ्या ऑटो मध्ये प्रवास करणारी व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कासारवडवली पोलिसांनी  घटनास्थळी पोहोचून अल्पवयीन ट्रक चालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार कायद्याचा संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.या अपघातात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांनी टोईंग मशीनच्या साहाय्याने खराब झालेले ट्रक आणि ऑटोरिक्षा हटवून वाहतूक सुरळीत केली. 
Edited By - Priya Dixit