शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (22:30 IST)

कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी मुदर तालवाला याला अटक केली आहे.
 
कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. पत्नी शिक्षिका माहेरी गेल्यानंतर या मुलीचे शिकवणी पती मुदर हा घेत होता. पत्नी घरी नसल्याची संधी साधून त्याने बलिकेवर लैगिंग अत्याचार केला. मुलीने शिकवणीला जाण्यास मनाई केल्यानंतर आईने तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने सर्व माहिती दिली. 
यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. डोंबिवली आणि कल्याण या दोन्ही घटना एकाच परिमंडळात येतात.