शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (13:18 IST)

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक साक्षीदार हजर, धक्कादायक खुलासा केला

मुंबई किनारपट्टीवरील क्रूझ जहाजातून एनसीबीने कथित अमली पदार्थ जप्त केल्याच्या प्रकरणातील साक्षीदार विजय पगारे याने शनिवारी दावा केला की अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला या प्रकरणात " फसवण्यात "  आले आहे.

आर्यन खान (23) याला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती आणि जवळपास तीन आठवडे तुरुंगात घालवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
साक्षीदार विजय पगारे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हा छापा पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला.
 
याआधी, या खटल्यातील आणखी एक स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर सेलने आरोप केला होता की, एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी आर्यनला सोडण्याच्या बदल्यात पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. एनसीबी आधीच या आरोपांची चौकशी करत आहे.