शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:35 IST)

श्रीशिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी

श्रीशिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे मुंबईतल्या एनसीबी कार्यालयासमोर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी वानखेडेंच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. यावेळी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. ते म्हणाले, “आमची वानखेडेंकडे मागणी आहे की तुम्ही कुठल्याही आरोपांकडे लक्ष न देता कारवाई करत राहा. तुम्ही जी कारवाई केली आहे ती अगदी योग्य आहे. ड्रग्जच्या रॅकेटचा तुम्ही पर्दाफाश करा. आमच्या संघटनेतर्फे आम्ही पूर्ण राज्यभरातून त्यांना समर्थन देत आहोत. आर्यन शाहरुख खानला वाचवण्यासाठी समीर वानखेडेंवर रोज नवनवे आरोप करणाऱ्या नवाब मलिकांचा आम्ही निषेध करत आहोत आणि देशातला, राज्यातला युवक वानखेडेंसोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत”.
 
यावेळी या कार्यकर्त्यांनी ‘समीर वानखेडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी उपस्थितांनी ‘ड्रग्ज का दुश्मन समीर वानखेडे’ असे पोस्टर्सही सोबत आणले होते.