बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:13 IST)

अजोय मेहता यांच्या फ्लॅटवर आयकर विभागाने आणली टाच

राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता यांच्या नरिमन पॉईंटमधील फ्लॅटवर आयकर विभागाने बेनामी मालमत्ता हस्तांतरण कायदा, १९८८ अंतर्गत टाच आणली आहे. अजोय मेहता यांचा नरिमन पॉईंट येथील फ्लॅट आयकर विभागाच्या स्कॅनरवर होता. अखेर त्यांच्या फ्लॅटवर टाच आणण्यात आली आहे.
 
पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले हे या प्लॅटचे फायदेशीर मालक आहेत. ही मालमत्ता बेनामी असल्याचे माहीत असूनही अजोय मेहता यांनी ती विकत घेतली, असे आयकर विभागाच्या अहवालात म्हटले आहे. नरिमन पॉईंट येथील ह्या फ्लॅटची किंमत १०.६२ कोटी रुपये आहे. मात्र, मेहता यांना अनामित्रा प्रॉपर्टी प्रा. लि. या बोगस कंपनीने तो फ्लॅट ५.३३ कोटी रुपयांना २०२० साली विकला. आयकर विभागाची चौकशी पूर्ण होईपर्यंत हा फ्लॅट विकता येणार नाही, अशी अट आयकर विभागाने घातली असल्याचे समजते.
 
याबाबत अजोय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्या फ्लॅटवर आयकर विभागाने तात्पुरती टाच आणली आहे. मी आजही त्या घरात राहतो. मी माझ्या आयुष्यातील कमाई देऊन हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट मी बाजारभाव किमतीपेक्षा जास्त किंमत देऊन खरेदी केला आहे.