राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे ज्यांनी आपले प्राण गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहे. बचाव आणि मदत कार्यात लवकर यश मिळावे आणि वाचलेल्यांच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करेन.I am shocked and saddened to learn of the accident involving a passenger ferryboat and an Indian Navy craft boat near Mumbai Harbour. My condolences to the families of those who have lost their lives. I pray for the swift success of the rescue and relief operations and a quick…
— President of India (@rashtrapatibhvn) December 18, 2024
पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना लिहिले आहे की, “मुंबईतील बोट दुर्घटना दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून अपघातग्रस्त लोकांना मदत केली जात आहे.The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the boat mishap in Mumbai. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/EPwReaayYk
— PMO India (@PMOIndia) December 18, 2024
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो असे देखील ते म्हणाले. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारकडून चौकशी केली जाईल.मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या… https://t.co/JMSVccvFg5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2024