गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (16:19 IST)

मध्य रेल्वेचा 36 तासांचा जंबो मेगाब्लॉक,मुंबईच्या गाडयांच्या सेवेवर परिणाम

मध्य रेल्वेच्या मार्गावर 36 तासांचा जंबोमेगाब्लॉक लावण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक लावण्यात आला आहे. ठाणे ते कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर36 तास रेल्वे सेवा विस्कळीत असणार आहे. मध्य रेल्वेकडून आज दुपारी 2 ते सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हा जम्बो मेगा ब्लॉक लावण्यात आला आहे.
 
पाचव्या आणि सहाव्या नवीन लाईनला जोडण्याचे आणि मुंबईला लागून असलेल्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान क्रॉसओव्हर सुरू करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ठाणे ते मुंब्रा स्थानकांदरम्यान स्लो मार्गावर शनिवार 8 जानेवारी ते सोमवार 10 जानेवारी पर्यंत 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक लागू करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 2 ते सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या वेळी धीम्या मार्गावर जाणाऱ्या मुंबई लोकल जलद मार्गावरून जातील.
मेगाब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील. याशिवाय कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय लोकलची सेवा उपलब्ध होणार नाही. परप्रांतीयांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पालिका अधिकाऱ्यांशी बोलून या मार्गांवर बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे.
36 तास चालणाऱ्या या मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या सेवेवरच परिणाम होणार नाही तर मुंबई-ठाण्याहून बाहेर जाणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवेवरही याचा परिणाम होणार आहे. अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.