सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified मंगळवार, 1 जून 2021 (20:44 IST)

या जिल्ह्यात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता

सध्या पावसाने मान्सूनपूर्वीच जोरदार हजेरी लावली असून गेल्या आठवड्यापासून मेघसरी कोसळत आहे.आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस येत आहे. तर काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे.पुढच्या तीन तासात काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे.मुंबई हवामान खात्याने  दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 तासात पुणे नाशिक, धुळे, कोल्हापूर,अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे.तर 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने सुसाट वारा सुटणार आहे.असं ही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.काही शहर जसे की मुंबई,नवी मुंबई,ठाणे,पालघर,या शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.तर बीड,रायगड,लातूर मध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
यंदा केरळ मध्ये मान्सून 30 मे रोजी दाखल होण्याचे वर्तवण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव मान्सून येणास उशीर झाला. त्यामुळे आता हे मान्सून केरळ मध्ये 3 ते 4 जून च्या पर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.