शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (22:59 IST)

ट्रॉली बॅगमध्ये 34 कोटींचे हेरॉइन घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर कस्टमने पकडले

कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून 34.79 कोटी रुपयांचे 4,970 ग्रॅम हेरॉईन जप्त केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.प्रवाशाला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशाने आपल्या ट्रॉली बॅगमध्ये प्रतिबंधित पदार्थ लपवला होता.
 
विशिष्ट माहितीवर कारवाई करत कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी विमानतळावर एका प्रवाशाची झडती घेतली.मुंबई एअरपोर्ट कस्टम्सने ट्विट करून ही माहिती दिली.त्यात म्हटले आहे की, प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली असता ट्रॉली बॅगमध्ये खास बनवलेल्या 'कॅव्हिटी'मध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळून आला.
 
आरोपी प्रवाशाला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Edited By - Priya Dixit