रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 7 मार्च 2022 (15:27 IST)

Cyclone Alert: मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचे नवे संकट

मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचे संकट होणार आहे.  
 
मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात असले तरी भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहचू शकतो.
 
दुसरीकडे मुंबईलगत जागतिक तापमानवाढीसह समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांत वाढ होईल, अशीही भीती वर्तविण्यात आली आहे.