रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (12:41 IST)

मुंबई लोकलमधील धुळवड व्हायरल

mumbai local
Twitter
बॉलिवूडची जुनी गाणी इतकी सुंदर आहेत की आजही ती लोकांच्या ओठावर आहेत. लता मंगेशकर या आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय गायिका असून त्यांनी गायलेली गाणी आजही लोकांना ऐकायला आणि गायला आवडतात. मुंबई लोकलमधील प्रवाशांचा एक गट लता मंगेशकर यांची गाणी गाताना बघितला गेला असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
 
या मनोरंजक व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबई लोकलमधील प्रवाशांचा एक गट बॉलीवूड क्लासिक्स "सुन चंपा सुन तारा" आणि "दो घुंट मुझे भी पिला दे" गाताना दिसत आहे. काही प्रवासी उभे राहून नाचत आहेत, तर काही प्रवासी खिडक्यांवर आवाज करत संगीत देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांचे चेहरे बघून अंदाज बांधता येतो की या सर्वांनी थोडीफार होळी रंगली आहे.