सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 18 जुलै 2021 (17:19 IST)

मरणाच्या दारातून वृद्धाची सुटका

कल्याण रेल्वे स्थानकावरून एक नवा व्हिडियो समोर आला आहे.या व्हिडीओ मध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती चक्क रेल्वे रुळावरून जात असताना इंजिनच्या खाली आले.परंतु रेल्वेच्या चालकाने प्रसंगावधानाने आपत्कालीन ब्रेक दाबून त्यांचे प्राण वाचवले.
 
रेल्वे रूळ क्रॉस करणे हे धोक्याचे असते.असे आवाहन वारंवार केले जाते.तरीही लोक नियमांना धता देऊन बेसावधपणे रूळ ओलांडतात.बऱ्याच वेळा असे करणे जीवघेणे ठरते. आज कल्याण स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडियो समोर आला आहे.
 
या व्हिडिओ मध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती रेल्वेचे रूळ ओलंडताना मुंबईहून वाराणसी कडे जाणाऱ्या रेल्वेच्या खाली आली.या वेळी त्या ट्रेन चे पायलट आणि सहाय्यक यांनी ट्रेनचे आपत्कालीन ब्रेक दाबून त्या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवले.थोडा जरी उशीर झाला असता तर त्या वृद्ध व्यक्तींना प्राण गमवावे लागले असते.परंतु लोको पायलट आणि सहाय्यक यांनी प्रसंगावधान वेळीच ब्रेक दाबून त्यांचे प्राण वाचविले.ट्रेन वेळेवर थांबवून त्यांना त्या ट्रेनच्या खालून बाहेर काढले.नंतर तिथे लोकांची बरीच गर्दी झाली.