रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 9 जुलै 2024 (17:22 IST)

Mumbai Hit&Run case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक

arrest
मुंबई पोलिसांनी वरळी हिट अँड प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक केली आहे. आरोपी अपघात झाल्यापासून फरार होता. आरोपीच्या वडिलांना राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली होती. 
पीडितेच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक लोकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. 

वरिष्ठ पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने आरोपीची आई आणि दोन बहिणींनाही ताब्यात घेतले आहे. आरोपीचे वडील राजेश यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आलेला चालक राज ऋषी बिदावत याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी स्थानिक न्यायालयात सांगितले की, घटनेच्या वेळी मुख्य आरोपी मिहिर शाह (24वर्षे) कथितपणे कार चालवत होता. आरोपीने दुचाकीला धडक दिली या अपघातात आरोपीने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला धडक दिली त्यात पती जखमी झाला आणि पत्नीचा दुर्देवी मृत्यू झाला.
या घटनेत आरोपीने महिलेला दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. नंतर आरोपीने कार मध्ये बाजूला बसलेल्या कार चालकाला चालवायला दिली. 
 
मिहीर शाह हे शिवसेनेच्या पालघर युनिटचे नेते (शिंदे गट) राजेश शहा यांचा मुलगा आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर राजेशने आपल्या मुलाला घटनास्थळावरून पळून जाण्यास सांगितले होते. तसेच चालकाला घटनेची जबाबदारी घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी कोर्टात सीसीटीव्ही फुटेजही सादर केले होते ज्यात पीडित कावेरीला कारने 1.5 किमीपर्यंत खेचले जात असल्याचे दिसत होते.

रविवारी मुंबईतील वरळी भागात झालेल्या मारहाणीत कावेरी नाखवा हिचा मृत्यू झाला. पती प्रदीप नाखवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास मासे खरेदी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. त्याने सांगितले होते की एका वेगवान कारने त्याला धडक दिली, ज्याने कावेरीला सीजे हाऊसपासून सी लिंक रोडवर ओढले, परिणामी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पीडितेने न्यायची मागणी केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit