1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (16:56 IST)

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने काही नवे नियम केले जाहीर

मुंबई महापालिका हद्दीत नियंत्रणात आलेली कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने काही नवे नियमही जाहीर करण्यात आलेले आहेत. एखाद्या इमारतीत 10 पेक्षा अधिक कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळल्यास ती इमारत काही दिवसांसाठी सील केली जाईल.तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड आकारला जाईल, असेही पालिकेने म्हटले आहे. 
 
मुंबई महापालिकेने कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या पुन्हा एकदा नियंत्रणात आणण्यासाठी नवे मिशन हाती घेतले आहे. त्यासाठी पालिका कर्मचारी घरोखरी, गल्लोगल्ली जाऊन संपर्क अभीयान राबवणार आहेत. चेस द व्हायरस म्हणत कोरोना व्हायरस चाचण्याही मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे.
 
याआधी मुंबई महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणात ठेवण्यास पालिकेला काही प्रमाणात यश मिळाले होते.